scorecardresearch

मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन; लव्ह जिहाद, धर्मांतरणविरोधात कायदा करण्याची मागणी

या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत..

Hindu morcha
मुंबईत 'हिंदू समाजा'च्या वतीने 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'चं आयोजन; लव्ह जिहाद, धर्मांतरणविरोधात कायदा करण्याची मागणी

मुंबईत ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने ‘हिंदू जनआक्रोश मोर्च’चं आयोजन करण्यात आलं आहे. लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि लॅण्ड जिहाद विरोधात कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी दादार (प) येथील मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली. कामगार मैदान, प्रभादेवी येथे या मोर्चाचा समारोप होणार आहे. मोर्चात भाजपा, शिंदे गट आणि हिंदू संघटनांचे नेते सहभागी झाले आहे. तर, शिवसेनेचे ( ठाकरे गट ) नेते मोर्चात सहभागी झाले नसल्याचे भाजपाकडून टीकास्त्र सोडण्यात आलं.

मुंबईतील हिंदू बांधवांची ताकद एकत्र रस्त्यावर उतारावी. तसेच, हिंदू म्हणून एकत्र येत मोर्चातून समाजाल महत्वाचा संदेश द्यावा, या उद्देशाने मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आला आहे. या मोर्चात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतून विविध संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना सहभागी झाल्या आहेत.

हेही वाचा : लिंगायत समाजाच्या महामोर्चावरून सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

दरम्यान, मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. मोर्च्याच्या प्रत्येक चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. अशा मोर्चात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. त्यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 12:50 IST