ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार जावेद अख्तर यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या धर्मांधतेवर काय विचार होते यावर एक ट्वीट केलंय. यात सुभाषचंद्र बोस यांनी देशातील धर्मांधता आणि हिंदू राजवरून विनायक दामोदर सावरकरांसह हिंदू महासभेवर सडकून टीका केलीय. तसेच सावरकर आणि हिंदू महासभा मुस्लीमविरोधी विचारधारा अमलात आणून ब्रिटिशांसोबत संधान बांधत असल्याचा आरोप केलाय. याला संदर्भ सुभाषचंद्र बोस यांच्या मूळ लिखानांच्या संग्रहाच्या तिसऱ्या भागाचा संदर्भ देण्यात आलाय. सुभाषचंद्र बोस या कोटमध्ये म्हणतात, "धर्मांधतेनं आपलं विदृप डोकं अगदी नग्नतेप्रमाणे वर काढलं आहे. यामुळेच दबलेले-पिचलेले, गरीब मोठ्या काळावधीसाठी स्वातंत्र्यापासून दूर राहिलेत. आपण भारतात बहुसंख्य हिंदू लोकांसाठी हिंदू राजचे नारे दिल्याचं ऐकतोय. मात्र हे निरुपयोगी विचार आहेत. कामगार वर्गाला सहन करावा लागलेला एक तरी प्रश्न या धार्मिक संघटनांच्या माध्यमातून सोडवण्यात आलाय का?" "या धार्मिक संघटनांकडे बेरोजगारी आणि गरीबी यासारख्या प्रश्नांवर काही उत्तरं आहेत का? सावरकर आणि हिंदू महासभेची मुस्लीमविरोधी विचारधारा अमलात आणणं म्हणजे ब्रिटिशांसोबत संधान बांधणं आहे," असं मत सुभाषचंद्र बोस यांनी व्यक्त केलंय. हेही वाचा : चिंतनधारा : स्वराज्याचा पाया सुराज्याने काय वेळ आलीय? सुभाषचंद्रांनी नेहरूंना लिहिलेलं पत्र शेअर करत शशी थरूर म्हणाले… दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेलं एक पत्र ट्वीट केलंय. हे पत्र ट्वीट करताना शशी थरूर यांनी ‘आपले राजकीय नेते वाचायचे, लिहायचे, विचार करायचे आणि एकमेकांची काळजीही करायचे. तेव्हापासून आजपर्यंत आपण किती खालच्या पातळीवर आलोय?’ असं मत व्यक्त केलंय. शशी थरूर यांनी ट्वीट केलेल्या सुभाषचंद्र बोस यांचं हे पत्र ३० जून १९३६ रोजी दार्जिलिंगच्या पोलीस अधीक्षकांच्या घरून लिहिलेलं आहे. सुभाषचंद्र बोस यांनी या पत्रात लिहिलं आहे, “प्रिय जवाहर, तुमचं पत्र मिळालं. तुम्ही खूप जास्त प्रमाणात काम करत आहात असं मला समजलं. मला तुमच्या प्रकृतीविषयी काळजी वाटते आहे. मात्र, मला याचा आनंद आहे की तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना पण काम थांबवून मसूर येथे विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.” हेही वाचा : अग्रलेख : चुकीचा बरोबर अर्थ! “तुम्ही स्वतःला फार ताणू नका, जर तुमची प्रकृती बिघडली तर…” “मला याची कल्पना आहे की अधिकचं काम टाळणं तुमच्यासाठी किती कठीण असेल. त्यासाठी मी तुमचं कौतुक करतो. मात्र, तुम्ही स्वतःला फार ताणू नका. जर तुमची प्रकृती बिघडली तर यामुळे कोणालाही मदत होणार नाही. तुम्ही तुमचा मेव्हुणा रणजीतबद्दल जे सांगितलं ते ऐकून खूप दुःख झालं. असं असलं तरी डॉक्टरांनी अद्याप कोणताही गंभीर धोका नसल्याचं म्हटलंय हा काहिसा दिलासा आहे. बदल आणि आराम त्याला बरं व्हायला मदत करेल अशी आशा करुयात,” असं म्हणत त्यांनी नेहरू आणि त्यांच्या मेव्हुण्याच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली. “मला घशाच्या संसर्गामुळे ताप आलाय” नेहरूंनी बोस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली होती. त्याला उत्तर देताना सुभाषचंद्र बोस म्हणाले, “मी इथं चांगला आहे. माझ्या आतड्यांना केवळ थोडा त्रास आहे. तसेच मला घशाच्या संसर्गामुळे ताप आलाय. मात्र, वेळ जाईल तसा हा तापही जाईल.” हेही वाचा : नरेंद्र मोदींचा ‘मैं, मैं, मैं’चा जप २०२४ लोकसभा निवडणुकीत निरुपयोगी, कारण…: शशी थरूर “तुमच्या ग्रंथालयात खालीलपैकी कोणतीही पुस्तकं असतील तर एक किंवा दोन पुस्तकं मला पाठवाल,” असं म्हणत सुभाषचंद्र बोस यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात ८ पुस्तकांची नावं लिहिली होती. पत्रातील ८ पुस्तकं कोणती? १. हिस्टॉरिकल जिओग्राफी ऑफ युरोप२. क्लॅश ऑफ कल्चर अँड कॉन्टॅक्ट ऑफ रेसेस३. शॉर्ट हिस्टरी ऑफ आवर टाईम्स४. वर्ल्ड पॉलिटिक्स१९१८-३५५. सायन्स अँड द फ्युचर६. अफ्रिका व्ह्युव७. चंघीस खान८. द ड्युटी ऑफ एम्पायर