राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक रविवारी ( १४ मे ) पार पडली. या बैठकीला शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार भाई जगताप आणि अन्य महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर महाविकास आघाडीची एकत्ररित्या पत्रकार परिषद झाली. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, “कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला. महाविकास आघाडीच्या बैठकीत या निवडणुकींचा आढावा घेण्यात आला. यात भ्रष्टाचार, विविध तपास यंत्रणांचा गैरवापर आणि स्थानिक दृष्ट्या जनतेला त्या सरकारचा आलेल्या अनुभवांचा आढावा घेतला गेला.”

amitabh bachchan marathi news, amitabh bachchan lata mangeshkar marathi news
लतादीदींच्या स्वरात मधाची गोडी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भावना
mumbai university marathi news
परीक्षेस हजर राहूनही गैरहजरचा शिक्का
shivaji park dadar marathi news
शिवाजी पार्कमधील माती काढण्यात अडचणींचा डोंगर
PM Modi to address rallies in Maharashtra
मैदान निसटू न देण्यासाठी मोदींच्या सभांवर सभा!

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी”, मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर अंधारेंचा टोला; म्हणाल्या…

“लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत…”

“महाविकास आघाडी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील निकालाची तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी चर्चा केली. उन्हाळा असल्याने महाविकास आघाडीच्या सभा थोड्याशा प्रलंबित ठेवल्या आहेत. पावसाचे वातावरण पाहून सभा सुरु करणार आहोत. तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि आमच्या आघाडीतील अन्य पक्षांशी चर्चा करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत निर्णय घेणार आहोत,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

हेही वाचा : “निपाणीत शरद पवारांचा उमेदवार ‘पॅक’ करून पाठवला”, फडणवीसांच्या विधानावर खडसेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही…”

“महाराष्ट्रातील जनतेला ठाम पर्याय सक्षमपणे देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल. महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून मोठ्या अधिक ताकदीने पुढील काळात काम करेन,” असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.