… आणि जयंत पाटील यांनी लोकलने सीएसएमटी ते उल्हासनगर केला प्रवास!

लोकलमध्येही जयंत पाटील शासकीय कामाचा निपटारा करताना दिसले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज (शनिवार) सायंकाळी पक्षाच्या कामासाठी सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलने प्रवास केला. खुद्द मंत्रीमोहदय लोकल प्रवास करताना पाहून अनेकांना आश्चर्य देखील वाटले.

मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय ! हाच पर्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवडला. विशेष म्हणजे लोकलमध्येही जयंत पाटील शासकीय कामाचा निपटारा करताना दिसले.

आज पक्षाच्या कामकाजाकरीता उल्हासनगरला जात असताना जयंत पाटील यांनी बर्‍याच दिवसांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोकलने प्रवास केला. विद्यार्थी दशेत असताना जयंत पाटील यांनी लोकलने प्रवास केलेला आहे. तसेच मधल्याकाळातही अनेकवेळा त्यांनी लोकलने प्रवास केला होता. आजच्या प्रवासातील सहकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान सर्व जुन्या आठवणींना जयंत पाटील यांनी यावेळी उजाळा दिल्याची माहिती समोर आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jayant patil traveled by local from csmt to ulhasnagar msr

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या