जयंत पाटील यांची तब्येत बिघडली; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना त्रास सुरू झाला

(संग्रहीत छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना उपाचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रूग्णालयाकडे रवाना झाले.  त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत राजेश टोपे यांच्यासह जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील व अन्य काही मंत्री देखील असल्याची माहिती समोर येत आहे.  तसेच, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

जयंत पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाहणी केलेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jayant patils health deteriorated breach candy hospitalized msr

ताज्या बातम्या