राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड सामाजिक विषयांवर रोखठोक भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या यांच स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक वादही होतात. मात्र, यानंतरही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या रोखठोक भूमिका घेणं सोडलेलं नाही. आता आव्हाड यांनी आई-वडील यांची जात वेगळी असताना पाल्यांनी कोणती जात स्विकारावी या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. तसेच बाल्यांना बापाची जात बंधनकारक का? असा सवाल उपस्थित केलाय. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “जात लावताना ती बापाची लावली जाते. बापाची जात बंधनकारक का? आई हा महत्वाचा घटक आहे, मग तिची जात का लावता येऊ नये? कुठली जात लावावी, आईची की बापाची हे ठरवताना पाल्यांना स्वातंत्र्य द्यावे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकारच्या दारू धोरणावरून टीका करणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून देत टोला लगावला.

‘तुम करे तो रास लीला, हम करे तो चरित्र ढीला’

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मालक तुमच्या शिवराजसिंह यांच्या सरकारने देखील काही दिवसापूर्वी मध्यप्रदेशमध्ये असांच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राला का बदनाम करता आहात. ‘तुम करे तो रास लीला, हम करे तो चरित्र ढीला’.”

“अर्ज आले जवळपास १ कोटी २५ लाख (सव्वा कोटी), एका अर्जाची किंमत ५०० रुपये”

याशिवाय जितेंद्र आव्हाड यांनी बिहारमध्ये रेल्वे भरती घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनावरही ट्वीट केलं. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बिहारमध्ये सुरू असणाऱ्या रेल्वे बोर्ड-NTPC साठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लढाईतील एक वास्तव सांगतो. जागा होत्या सगळ्या मिळून ३७ हजारांच्या आसपास. अर्ज आले जवळपास १ कोटी २५ लाख (सव्वा कोटी), एका अर्जाची किंमत ५०० रुपये होती. या अर्जाचे एकूण पैसे ६२५ कोटी रुपये झाले.”

हेही वाचा : “हे घ्या तुमच्या ढोंगी अपप्रचाराला आमचे खरे उत्तर”, टिपू सुलतान वादावर जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला ‘तो’ फोटो!

“केंद्र सरकारकडे ६२५ कोटी एवढे पैसे १ वर्ष झालं पडून आहेत. त्यावरचं वर्षभरातील गोळा झालेलं व्याज वेगळं. यावर एकतरी मीडिया हाऊसने चर्चा घडवून आणली का?” असा सवाल आव्हाड यांनी केलाय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad comment on caste of children when father and mother belongs to different caste pbs
First published on: 28-01-2022 at 02:03 IST