‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट वादग्रस्त ठरला आहे. भाजपाकडून या चित्रपटाचं समर्थन होत आहे, तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून हा चित्रपट केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठीचा प्रचारपट असल्याची टीका होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटावर भाष्य केलं आहे. यात त्यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपट खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर असल्याची टीका केली. तसेच केरळची सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचं म्हटलं. त्यांनी मंगळवारी (९ मे) ट्वीट करत त्यांची भूमिका मांडली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. विदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर ९६ टक्के आहे, भारताचा ७६ टक्के आहे.”

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”
Devendra Fadnavis on Ambadas Danve
अंबादास दानवेंच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन केल्यानंतर…”

“बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये ६ टक्के, आसाममध्ये ४२ आणि उत्तरप्रदेशमध्ये ४६ टक्के”

“केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या ०.७६ टक्के आहे, देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या २२ टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये ६ टक्के आहे. आसाममध्ये ४२ टक्के आहे आणि उत्तरप्रदेशमध्ये ४६ टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या ७ टक्के अधिक आहे,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

“३ महिलांची कथा ३२ हजार महिलांची म्हणून दाखवली”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “त्या चित्रपटामध्ये जी ३२ हजार महिलांची कथा सांगितली गेली त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की, ही कथा फक्त ३ महिलांची आहे. चित्रपट चालावा यासाठी ३२ हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत त्यांना काही समजतच नाही त्या वाटेल तशा वागतात असे प्रदर्शित करायचं.”

हेही वाचा : “मोदींना लग्नाचा अनुभव नसल्याने…”; ‘द केरला स्टोरी’ला दिलेल्या पाठिंब्यावरून प्रकाश आंबेडकरांचा टोला!

“हिंसा, द्वेष निर्माण करून निवडणूका जिंकायच्या हे चित्रपटाचं गणित”

“शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळवर आधारीत चित्रपटाचं खरं सत्य आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.