व्यापारातही धर्म? भगव्या स्टिकरवाल्या दुकानांतून खरेदीच्या हिंदू महासंघाच्या आवाहनानंतर आव्हाड म्हणाले, “मग यापुढे…”

हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ज्या दुकानावर भगवे स्टिकर आहे त्याच दुकानातून वस्तू खरेदी करण्याची शपथ घेतली. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Jitendra Awhad NCP Leader

देशातील धार्मिक धृवीकरणाचं वातावरण वाढताना दिसत आहे. हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ज्या दुकानावर भगवे स्टिकर आहे त्याच दुकानातून वस्तू खरेदी करण्याची शपथ घेतली. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हिंदू महासंघाची ही शपथ म्हणजे थोडक्यात बहिष्कार आणि वर्णवर्चस्ववाद आहे, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. तसेच मग हिंदू महासंघाचे कार्यकर्ते यापुढे करोना लसी घेणार नाहीत, असा टोलाही लगावला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतली की, भगवे स्टिकर ज्या दुकानांवर असेल त्याच दुकानातून वस्तू खरेदी करायच्या. म्हणजे थोडक्यात हिंदूंनी कुठल्याही इतर धर्मियांच्या दुकानात जायचे नाही. थोडक्यात बहिष्कार. वर्णवर्चस्ववाद.”

हेही वाचा : “शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “तुमच्या डोक्यात…”

“जे करोनाचे वॅक्सीन घेत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन हे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे मालक हे एक पारसी आहे आणि एक मुसलमान आहे. म्हणजे बहुतेक महासंघाचे कार्यकर्ते आता या लसी यापुढे घेणार नाहीत,” असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad criticize hindu mahasangh over purchasing from only orange sticker shops pbs

Next Story
नवी मुंबई : पार्किंगवरून एकाला हॉकी स्टीकने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी