scorecardresearch

Premium

“शेरास सव्वाशेर गुजराती, मारवाडी मराठी लोकांना लाथ घालतो तेव्हा…”, मुंबईतील ‘त्या’ प्रकारावर आव्हाडांची टिप्पणी

मुलुंडमध्ये महिलेला घर नाकारल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

jitendra awhad
जितेंद्र आव्हाड यांनी मुलुंडमधील प्रकरणावर भाष्य केलं आहे.

मुंबईत मुलुंड पश्चिममध्ये ‘महाराष्ट्रीयन’ असल्यामुळे एका महिलेला घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही भाष्य केलं आहे. शेरास सव्वाशेर गुजराती, मारवाडी, जैन हे मराठी लोकांना जेव्हा लाथ घालतो तेव्हा, हे किंचाळतात, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

तृप्ती देवरूखकर नावाच्या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तृप्ती देवरूखकर यांनी मुलुंड पश्चिमेला ‘शिवसदन’ नावाचा इमारतीत घरासाठी जागा पाहिली होती. पण, ‘महाराष्ट्रीयन लोकांना जागा देत नाही,’ असं सोसायटीमार्फत या महिलेला सांगण्यात आलं. सोसायटीकडून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला असल्याचं तृप्ती देवरूखकर व्हिडीओत सांगतात.

migrant hawkers on kalyan railway skywalk beaten up by mns workers
मराठी लोकांबद्दल टिप्पणी, कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांचा चोप
rail roko in punjab by farmers protest
पंजाबमधील शेतकरी रेल्वे रोको आंदोलन का करत आहेत?
Sanjay Raut on Manipu mention Narendra Modi
“मणिपूरची परिस्थिती भयंकर, विद्यार्थ्यांना गोळ्या झाडून…”; मोदींचं नाव घेत संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…
sanjay raut eknath shinde (1)
“हा एवढा माज कोठून आला? याचं…”, मुलुंडमध्ये महिलेला घर नाकारल्यानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘तुम्ही जे सांगत आहात ते लेखी द्या’, असं तृप्ती देवरूखकर यांनी मागितलं. मात्र, नंतर तृप्ती देवरूखकर यांच्याबरोबर सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची भाषा सुरू केली. तसेच, हुज्जतही घातली आहे. नवऱ्याला मारहाण केल्याचा आरोप तृप्ती देवरूखकर यांनी व्हिडीओत केला आहे.

हेही वाचा : “हा एवढा माज कोठून आला? याचं…”, मुलुंडमध्ये महिलेला घर नाकारल्यानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तृप्ती देवरूखकर यांनी घडलेला सर्व प्रकार सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला. याची दखल घेत मनसेनं थेट शिवसदन सोसायटी गाठली. सोसायटीकडून बोललेल्या व्यक्तीला मनसेनं जाब विचारत खडसावलं. काही वेळ चर्चा झाल्यानंतर सोसायटीमार्फत बोललेल्या व्यक्तीनं माफी मागितली आहे.

“…म्हणून घरे मिळत नाहीत”

यावर ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मराठी महिलेला घर नाकारलं म्हणून गुजराथी लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारवाडी, जैन, गुजराती हाउसिंग सोसायटीमध्ये मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून घरे मिळत नाहीत. मुंबईत हे सगळ्यांना माहितीच आहे.”

हेही वाचा : मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई, दोन नेत्यांवर आरोप करत म्हणाले…

“धर्म पाहून मुस्लिमांना घर नाकारतात”

“मुलुंडमधील घटनेनंतर गुजराती लोकांना हाकलून लावा, अशा कमेंटचा पाऊस न्यूज खाली पडला. हेच मराठी लोक जात पाहून अनुसूचित जातीतील लोकांना घरे नाकारतात. धर्म पाहून मुस्लिमांना घर नाकारतात. शेरास सव्वाशेर गुजराथी मारवाडी जैन हे मराठी लोकांना जेव्हा लात घालतो तेव्हा हे किंचाळतात… कटू पण सत्य आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad taunt marathi manus over women trupti devrukhkar not allowed home mulund shivsadan society ssa

First published on: 28-09-2023 at 15:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×