जॅान्सन अँड जॉन्सन प्रा.लि या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा उत्पादन परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. या प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्याचे कारण देत हा परवाना रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: चीनमधील ४२ मजली इमारतीला भीषण आग; इमारतीमध्ये चीनच्या सरकारी टेलिकॉम कंपनीचं कार्यालय

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
food and drugs police uniform marathi news
अन्न व औषध प्रशासनातही पोलिसांप्रमाणे गणवेश? राज्य शासनाला प्रस्ताव सादर
corruption, neutral vigilance department,
‘तटस्थ दक्षता विभाग’ असल्याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार थांबेल कसा?
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

मुंबई शासकीय विश्लेषक आणि औषध नियंत्रण प्रयोगशाळा यांनी वरील दोन्ही नमुने राष्ट्रीय मानकांनुसार अयोग्य असल्याचा निष्कर्ष नोंदवून अप्रमाणित घोषित केले होते. यानुसार अनुज्ञप्ती रद्द का करण्यात येऊ नये, अथवा नमूद केलेल्या परवान्याअंतर्गत मंजूर असलेल्या सौंदर्य प्रसाधनाची उत्पादन अनुमती निलंबित किंवा रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा कारणे दाखवा नोटीस बजावण्यांत आली होती. तसेच कंपनीला उत्पादनाचा साठा बाजारातून परत बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

नमुन्याचे प्राप्त शासकीय विश्लेषकाचे अहवाल मान्य नाही म्हणून कंपनीने केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून फेरचाचणी होण्यासाठी नाशिक व पुणे न्यायालयात अर्ज केला होता. केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून ही फेरचाचणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोलकत्ता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेने या नमुन्यांची चाचणी अप्रमाणित घोषित केली. कोलकाता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेचा अहवाल हा निर्णायक पुरावा असल्यामुळे, अनुज्ञप्तीधारकाने उत्पादित केलेले संबंधित उत्पादन हे अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा – २६ जुलैला CM शिंदेंनी पाठवलेलं ‘वेदान्त’च्या मालकांना पत्र; केंद्र सरकारचा उल्लेख असणाऱ्या दोन मोठ्या मागण्यांबद्दल पहिल्यांदाच खुलासा

‘जॅान्सन बेबी पावडर’चा प्रामुख्याने नवजात बालकांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे या उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त उत्पादन सुरू ठेवणे हे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. त्यामुळे कंपनीच्या मुलुंड उत्पादन कारखान्याचा “जॅान्सन बेबी पावडर” या उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, असे अन्न व औषध प्रशासनाचो सहआयुक्त गौरीशंकर बायले यांनी सांगितले आहे.