बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी वाढ करण्यात आली. त्यांना सात मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
समीर भुजबळ यांना एक फेब्रुवारीला रात्री अटक करण्यात आली होती. त्यांना ८ फेब्रुवारीपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत ठेवण्यात आल्यानंतर त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला.