सरकारी कामात अडथळा आणून कर्तव्य बजाविणार्‍या पोलीस पथकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तडीपार गुन्हेगाराला जुहू पोलिसांनी अटक केली. सागर चिविलकर असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

हेही वाचा- मुंबई: बनावट कार्डद्वारे एटीएममधून रक्कम काढणाऱ्या दोघांना अटक

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

तानाजी कांबळे हे अंधेरी येथे राहत असून जुहू पोलीस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून काम करतात. चार दिवसांपूर्वी ते दिवसपाळीवर कर्तव्य बजावित होते. त्यावेळी कूपर रुग्णालयाजवळ स्थानिक लोकांनी एका चोराला पकडले असून पोलीस मदत हवी असल्याचा दूरध्वनी केला होता. त्यानंतर तानाजी कांबळे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथे रवाना झाले. घटनास्थळी पोलिसांनी सागर चिविलकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तक्रारादार नचिकेत हातोळे हा तरुण मुकेश पटेल शैक्षणिक संस्थेत शिकत असून सागरने त्याच्या बॅगेत हात घालून त्याने चोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी नचिकेतने त्याला पकडले होते, पळून जाण्याचा प्रयत्न करताना चोराने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सागर याने पोलिसांनाही धक्काबुक्की करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा- परळ टीटी पुलाच्या दुरुस्तीसाठी १८ कोटी; पुलावरील सांध्यांची संख्या कमी करण्याचा महापालिकेचा निर्णय

चौकशीअंती सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. त्याच्या वाढत्या कारवायांची दखल घेऊन जुहू पोलिसांनी त्याला मुंबईतून एक वर्षासाठी तडीपार केला होता. मे २०२२ रोजी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. या आदेशाचे उल्लघंन करुन तो मुंबईत आला होता आणि त्याने पुन्हा एक गुन्हा करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने एका महाविद्यालयीन तरुणासह पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धमकी दिली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.