मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे हे मंगळवारी शपथ घेणार आहेत. राजभवन येथे सायंकाळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे न्यायमूर्ती आराधे यांना मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ देतील.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने ७ जानेवारी रोजी तेलंगणाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कार्यरत असलेल्या आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर, त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारने राष्ट्रपतींकडे पाठवला होता. त्याला राष्ट्रपतींनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली.

article about mpsc exam preparation
एमपीएससी मंत्र : राज्यसेवा मुख्यपरीक्षा – इतिहास घटकाची तयारी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Eknath Shindes statement said beloved brother is bigger than post of Chief Minister or Deputy Chief Minister
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ मोठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
right to die with dignity
‘सन्मानाने मरण्याचा अधिकार’ म्हणजे काय? ‘हे’ राज्य ठरणार इच्छा मरणाचा अधिकार देणारं देशातील दुसरं राज्य
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
व्यक्तिवेध: एस. राधाकृष्णन
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?

हेही वाचा >>>मुंबई : महापालिकेचे ५८६ कर्मचारी निवडणूक कामातच, ४६ जणांचे वेतन रोखले

न्यायमूर्ती आराधे हे मूळचे मध्यप्रदेश येथील आहेत. त्यांची २००९ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर २०११ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले. त्यानंतर, २०१६ मध्ये न्यायमूर्ती आराधे यांची जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात बदली झाली आणि २०१८ मध्ये त्यांनी तिथे तीन महिने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. पुढे, १७ नोव्हेंबर २०१८ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती आराधे यांनी शपथ घेतली आणि तेथेही २०२२ मध्ये त्यांनी काही महिने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. जुलै २०२३ मध्ये न्यायमूर्ती आराधे .यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली. मूळचे अलाहाबाद येथील असलेले न्यायमूर्ती उपाध्याय यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारला होता. तसेच, सव्वावर्षांहून अधिकच्या मुख्य न्यायमूर्तीबदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणांवर निकाल दिला. मराठा आरक्षणाशी संबंधित सुनावणीही त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुरू होती.

Story img Loader