scorecardresearch

मुंबई: विजय केंकरे यांचे रंगभूमीवर शतक; ‘काळी राणी’ नाटकाचा ११ डिसेंबर रोजी प्रयोग

गेली अनेक वर्षे रंगभूमीवर प्रभावीपणे आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे आता ‘काळी राणी’ या नव्या नाटकासह आपल्या नाट्यकारकीर्दीचे शतक साजरे करीत आहेत.

मुंबई: विजय केंकरे यांचे रंगभूमीवर शतक; ‘काळी राणी’ नाटकाचा ११ डिसेंबर रोजी प्रयोग
विजय केंकरे दिग्दर्शित ‘काळी राणी’

गेली अनेक वर्षे रंगभूमीवर प्रभावीपणे आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे आता ‘काळी राणी’ या नव्या नाटकासह आपल्या नाट्यकारकीर्दीचे शतक साजरे करीत आहेत. विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेले ‘काळी राणी’ हे शंभरावे नाटक असून हे नाटक ११ डिसेंबर रोजी रंगभूमीवर येत आहे.

हेही वाचा >>>मुंबई महानगरपालिकेची प्रभागसंख्या कमी करण्याच्या कायद्याला आव्हान; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

मी इतकी नाटके दिग्दर्शित केली यावर विश्वासच बसत नाही. मात्र अजूनही चांगले नाटक करायचे आहे. रत्नाकर मतकरी लिखित ‘काळी राणी’ नाटक दिग्दर्शित करीत असल्याबद्दल सर्वाधिक आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया विजय केंकरे यांनी व्यक्त केली. या नाटकात मनवा, हरीश दुधाडे, आनंद पाटील, चंद्रलेखा जोशी, आणि डॉ. गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, ‘काळी राणी’ या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचा ६६६६ वा प्रयोग रंगणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 14:55 IST

संबंधित बातम्या