कल्याण : गवत पेटवून त्यावरून बैलांना उडी मारायला लावल्या ; व्हिडिओ व्हायरल

प्राणी मित्रांकडून कारवाईची मागणी

कल्याणमध्ये गवताला लावलेल्या आगीवरून बैलांना उड्या मारायला लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दिवाळी निमित्त कल्याण पूर्वेकडील काटेमानवली-चिंचपाडा भागात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमादरम्यान हा थरार मोबाईल व्हिडिओत कैद झाला असून हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे .

गवताला आग लावून त्यावरून बैलांना उड्या मारायला लावून बैलांच्या जीवाशी खेळ केला जात असून, अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या विरोधात कारवाईची प्राणी मित्रांकडून करण्यात आली आहे. याबाबत व्हिडिओ तपासून योग्य ती कायदेशीर कारवाइ केली जाईल असे कोलशेवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kalyan the grass was set on fire and the oxen were made to jump on it msr

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या