मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन; मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले

अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई

भीषण आगीत भस्मसात झालेला कमला मिल्स कम्पाऊंडमधील पब.

लोअर परळ भागातील कमला मिल्स कंपाऊंड परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आग प्रकरणी मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जी साऊथ वॉर्ड ऑफिसमधील पालिका उपायुक्त प्रशांत सपकाळे यांची बदली करण्यात आली आहे. एएनआय वृत्त संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश बीएमसीला देण्यात आले आहेत. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या पाच पालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याचबरोबर आग लागलेल्या बार आणि पबच्या मालकांवर कारवाईचे आदेशही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई महापालिका दोषी आढळल्यास पालिकेवरही कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kamala mills fire five bmc officials have been suspended