“उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं”, कांचन गिरींचा हल्लाबोल, राज ठाकरेंवर ‘ही’ प्रतिक्रिया

कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असं मत कांचन गिरी यांनी व्यक्त केलं.

कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असं मत कांचन गिरी यांनी व्यक्त केलं. मात्र, यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं कौतुक केलं. हिंदुराष्ट्राच्या बांधणीसाठी राज ठाकरेंची भेट घेत असल्याचं कांचन गिरी यांनी सांगितलंय. राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कांचन गिरी आणि सुर्याचार्य दोघे मुंबईत दाखल झालेत. यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या.

कांचन गिरी म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करत होते. ते हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे हिंदूंसाठी बोलायचे.”

“पालघर हत्यांकाडावेळी उद्धव ठाकरेंनी कान-डोळे दोन्ही बंद केले”

“उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला. त्यासाठी मी नाराज आहे. पालघरमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केले होते,” असा आरोप कांचन गिरी यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

हेही वाचा : “ …तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला देखील झालो असतो ” ; उद्धव ठाकरेंचं विधान!

” राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीयांबाबत पूर्वग्रह”

कांचन गिरी यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं. “राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प राज ठाकरे पूर्ण करतील. राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीयांबाबत जो पूर्वग्रह झालाय तो मी दूर करेल. ते समजुतदार आहेत त्यामुळे ते हे समजून घेतील,” असंही कांचन गिरी यांनी नमूद केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kanchan giri criticize uddhav thackeray over hindutva comment on raj thackeray pbs