मुंबईप्रमाणेच उपनगरातील रुग्णालये अत्याधुनिक करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. महानगरपालिका पश्चिम उपनगरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामधील नवजात शिशू अतिदक्षता विभागात ‘कांगारू मदर केअर’ कक्ष सुरू करीत आले आहे. यामुळे नवजात शिशुंना वैद्यकीय उपचारासोबतच इतर विशेष सेवा उपलब्ध करणे शक्य होणार आहे. हेही वाचा >>>पवार, ठाकरे यांच्या नावे अमृता फडणवीस यांना धमक्या, अनीक्षा जयसिंघानीच्या भ्रमणध्वनी संदेशाच्या आधारे पोलिसांचा दावा कूपर रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागामधील या कक्षामुळे येथे दाखल नवजात शिशुंना वैद्यकीय उपचारासोबतच इतर विशेष सेवा उपलब्ध करता येणार आहेत. येथे शिशुंच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेतली जाईल. कुपोषणामुळे संभाव्य इतर आजारांचे धोके कमी होतील. तसेच मातांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल. कांगारू मदर केअर कक्षामधील दृकश्राव्य संचाद्वारे मातेला बाळाच्या प्रकृतीची योग्य काळजी व देखभाल घेण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले. हेही वाचा >>>वर्सोवा पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली; मुंबई, ठाण्याहून गुजरातला जाणे सोयीचे ‘ॲक्शन अगेन्स्ट हंगर’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी विशेष प्रयत्न केले. या युनिटच्या उद्घाटनला ॲक्शन अगेन्स्ट हंगर संस्थेचे अध्यक्ष अश्विनी कक्कर, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उल्हास वसावे, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या (एनआयसीयू) प्रमुख डॉ. चारुशीला कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.