कर्जत-लोणावळा दक्षिण-पूर्व घाट विभागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान अप मुख्य मार्गावर; तसेच मध्य मार्गावर दरड कोसळल्याने तिन्ही मार्गांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ३.०५ वाजता खंडाळा-मंकी हिलदरम्यान मध्य मार्गावरही दरड कोसळली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून काहींच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
रद्द करण्यात आलेल्या प्रमुख रेल्वेगाड्या
गाडी क्रमांक २२१०५/२२१०६ सीएसएमटी–पुणे–सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२१२७ /१२१२८ सीएसएमटी–पुणे–सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ११००७/११००८ सीएसएमटी–पुणे–सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२१२३/१२१२४ सीएसएमटी–पुणे–सीएसएमटी डेक्कन क्वीन
गाडी क्रमांक १२१२५/१२१२६ सीएसएमटी–पुणे–सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ११००९ सीएसएमटी–पुणे सिंहगड एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ११०१० पुणे–सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ११०११ /११०१२ सीएसएमटी–धुळे–सीएसएमटी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२१६९ /१२१७० पुणे–सोलापूर–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
वळविण्यात आलेल्या प्रमुख रेल्वेगाड्या
- गाडी क्रमांक ११०४९ अहमदाबाद–कोल्हापूर एक्स्प्रेस कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे मार्गे वळवण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक २२९४४ इंदूर–दौंड एक्स्प्रेस कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे वळवण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक १२२९७ अहमदाबाद–पुणे दुरंतो एक्स्प्रेस कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे मार्गे वळवण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक २२१४४ बिदर–सीएसएमटी एक्स्प्रेस दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे वळवण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक १७६१४ हजूर साहिब नांदेड–पनवेल एक्स्प्रेस दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे वळवण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक १६५५४ एलटीटी – एसएमव्हीटी बेंगळुरू एक्स्प्रेस कर्जत – पनवेल – कल्याण – कसारा – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे वळवण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक २२१९३ दौंड – ग्वाल्हेर अतिजलद एक्स्प्रेस लोणावळा – पुणे – दौंड कॉर्ड लाईन – अंकाई – भुसावळ – खंडवा मार्गे वळवण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक २२१५८ चेन्नई इग्मोर – सीएसएमटी मेल दौंड कॉर्ड लाईन – अंकाई – मनमाड – इगतपुरी – कसारा – कल्याण – सीएसएमटी मार्गे वळवण्यात आली आहे.
याशिवाय काही रेल्वेगाड्या पनवेल किंवा पुणे येथेच अंशतः समाप्त करण्यात आल्या असून काही रेल्वेगाड्या तेथूनच सुटणार आहेत. एलटीटी–विशाखापट्टणम आणि सीएसएमटी–कोल्हापूर या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले असून, घाट विभागातील दरड हटविण्याचे आणि मार्ग पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती दिली आहे.
