Drugs on Cruise: “…अशी सुरु होती बड्यांना अडकवण्याची तयारी!”, Whatsapp चॅट शेअर करत मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

यापूर्वी मलिकांनी आक्षेप घेतलेल्या काशिफ खानचा उल्लेखही या चॅट्समध्ये करण्यात आलेला आहे.

Sameer Wankhede reply to Nawab Malik counterfeit notes allegations

नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातलं आरोप-प्रत्यारोपांचं सत्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. गेले काही दिवस हे प्रकरण काहीसं थंडावलं असतानाच आता पुन्हा या आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला असल्याची चिन्ह दिसून येऊ लागली आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी काही Whatsapp चॅट्सही शेअर केले आहेत.

नवाब मलिकांनी आज केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी Whatsapp चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हे चॅट्स केपी गोसावी आणि त्याचा खबरी यांच्यामधले असल्याचा दावा मलिकांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. हे चॅट्स शेअर करताना मलिक म्हणतात, “केपी गोसावी आणि खबऱ्यामधले हे चॅट्स आहेत. यामध्ये काशिफ खानचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. मग काशिफ खानची चौकशी का झाली नाही? काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यात काय संबंध आहे? यावरुन कळतंय की कशाप्रकारे कॉर्डेलिया क्रूझ पार्टीला हजेरी लावणाऱ्या लोकांना अडकवण्याची तयारी सुरू होती. ही समीर दाऊद वानखेडेंची खासगी सेना आहे. त्यामुळे त्यांना आता बऱ्याच प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत”.

हेही वाचा – काशिफ खानने क्रूझ पार्टीवर येण्यासाठी सरकारमधील ‘या’ मंत्र्यालाही केला होता आग्रह; नवाब मलिकांचा दावा

कोण आहे काशिफ खान?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याआधीही काशिफ खानबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ते यापूर्वी म्हणाले होते की, माझा प्रश्न असा होता की हा दाढीवाला कोण आहे? हा दाढीवाला फॅशन टीव्हीचा भारतातला प्रमुख आहे. हा फॅशनच्या नावाखाली पॉर्नोग्राफी, ड्रग्स आणि सेक्स रॅकेटचा धंदा करतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kashif khan mumbai cruise drugs case sameer wankhede nawab malik vsk

ताज्या बातम्या