मुंबई : ‘स्टोरी एक्सप्रेस’ या संस्थेने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) आणि अक्षरा फाउंडेशन यांच्या सहकार्याने ९ मार्च रोजी भायखळा येथील राणीच्या बागेत चौथ्या ‘कथाकथन महोत्सवा’चे आयोजन केले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि त्यांना प्राणी व वृक्ष जगताची माहिती प्राप्त व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात दहा सामाजिक संस्थांच्या शाळांमधील एकूण ३३० विद्यार्थी सहभागी झाले होते.

या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राणीच्या बागेची सफर घडविण्यात आली. यावेळी जीवशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक साटम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना राणीच्या बागेतील प्राण्यांच्या जीवनशैलीबाबत माहिती दिली. कासिम अन्सारी, केटी बागली, रेनी व्यास आणि गौरी गुरव यांनी झाडांबद्दलचे बारकावे कथेच्या माध्यमातून समजावून सांगितले. कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून उषा व्यंकटरामन यांनी मजेशीर पद्धतीने कथा उलगडली. कविता लेखन, कथा-संवाद, एनिमेशन, कवितेतून अध्यापन, कला, प्राण्यांबाबतच्या पौराणिक कथा आदींच्या माध्यमातून यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राणीच्या बागेतील सफरीसंदर्भात वृत्तलेखन कसे करावे याबाबतचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात आले.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

हेही वाचा – धक्कादायक! समाज माध्यमावर बनावट खाते उघडून बेरोजगार मुलींशी अश्लील चाळे

हेही वाचा – जी २० शिखर परिषदेसाठी नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रूप पालट

१२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळाही घेण्यात आली. चिल्ड्रन्स फिल्म्स सोसायटीची निर्मिती असलेला पंचतंत्रावर आधारित ‘मा’ हा एनिमेटेड चित्रपट दाखविण्यात आला आणि राणीच्या बागेची ‘व्हर्चुअली वाइल्ड’ ही आभासी सफर चित्रफितीच्या माध्यमातूनही घडविण्यात आली. याचसोबत विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तकेही देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. विविध उपक्रमांच्या माहितीसाठी storyxpressacl@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन ‘स्टोरी एक्सप्रेस’च्या रीना अग्रवाल यांनी केले.