विक्रोळी परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून राजस्थानमधील व्यक्तीसोबत तिचा जबरदस्तीने विवाह केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत विक्रोळी पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका करून एका महिलेसह चार जणांना अटक केली.

विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात राहणारी १७ वर्षीय पीडित मुलगी २३ डिसेंबरला महाविद्यालयात गेली होती. मात्र ती रात्रीपर्यंत घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी याबाबत पार्क साईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी पोलीस पथकाला तात्काळ मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

हेही वाचा – गुन्हा दाखल झाल्याच्या नावाखाली १४ लाखांची सायबर फसवणूक

दादर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून ही मुलगी एक महिला आणि एका व्यक्तीसोबत कर्नाटकला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर मिरज रेल्वे स्थानाकाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तिघेही एका दुचाकीवर दिसले. पोलिसांनी तात्काळ दुचाकी क्रमांकावरून आरोपीची ओळख पटवली.

हेही वाचा – मुंबई : रविवारी हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लाॅक, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-मुंबई सेन्ट्रलदरम्यान ब्लाॅक

दोन्ही आरोपी चेंबूर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सुनीता जोशी (२४) आणि तडप्पा गोवी (३४) या दोघांना अटक केली. तपासात त्यांनी कर्नाटक येथे राहणाऱ्या गणपत कांबळे (५०) या व्यक्तीच्या माध्यमातून भावाराम माळी (२८) याला मुलगी एक लाख रुपयात विकली व त्याच्याशी तिचा विवाह लावून दिला. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनाही कर्नाटक येथून अटक केली.