मुंबईः प्रसिद्ध गायक सिद्धु मुसावाला यांच्या हत्येनंतर चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना धमक्या देण्याचे सत्र सुरूच आहे. निर्माता संदीप सिंह यांनाही फेसबुकवरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरी पश्चिम येथील रहिवासी संदीप सिंह यांना बुधवारी फेसबुकवर धमकी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा सिंह राजपूत या फेसबुक खात्यावरून संदीप सिंह यांना धमकी आली आहे. त्यात आरोपीने ‘चिंता मत करना, मुसावाला को गोली मारी गयी है. उसी तरहा तुझे भी मारा जाएगा, वेट कर और याद रख’, अशी धमकी संदीप सिंह यांना त्यांच्या फेसबुक खात्यावर देण्यात आली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी धमकी देणाऱ्या फेसबुक खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
Fraud of crores by selling replicas of famous painters including MF Hussain Mumbai
एम.एफ हुसैनसह प्रसिद्ध चित्रकारांच्या प्रतिकृती विकून कोट्यावधींची फसवणूक; हवाला नेटवर्कच्या माध्यमातून मनी लाँडरींग

यापूर्वी अभिनेता सलमान खानलाही पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याची या धमकीप्रकरणी चौकशीही करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी या धमकीप्रकरणी सर्व खबरदारी बाळगली होती. धमकीचे पत्र सलमान खानच्या एका सुरक्षा रक्षकाला मिळाले होते. दरम्यान, आता सलमान खाननंतर राजस्थानमधील जोधपुर येथील त्याच्या वकिलांनाही धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगचे राजस्थान कनेक्शन पुन्हा उघड झाले आहे.