‘मुसावाला की तरहा तुझे भी मार देंगे’; सलमान खाननंततर आता चित्रपट निर्मात्याला धमकी

प्रसिद्ध गायक सिद्धु मुसावाला यांच्या हत्येनंतर चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना धमक्या देण्याचे सत्र सुरूच आहे.

sandip singh
निर्माता संदीप सिंह यांनाही फेसबुकवरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबईः प्रसिद्ध गायक सिद्धु मुसावाला यांच्या हत्येनंतर चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना धमक्या देण्याचे सत्र सुरूच आहे. निर्माता संदीप सिंह यांनाही फेसबुकवरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरी पश्चिम येथील रहिवासी संदीप सिंह यांना बुधवारी फेसबुकवर धमकी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा सिंह राजपूत या फेसबुक खात्यावरून संदीप सिंह यांना धमकी आली आहे. त्यात आरोपीने ‘चिंता मत करना, मुसावाला को गोली मारी गयी है. उसी तरहा तुझे भी मारा जाएगा, वेट कर और याद रख’, अशी धमकी संदीप सिंह यांना त्यांच्या फेसबुक खात्यावर देण्यात आली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी धमकी देणाऱ्या फेसबुक खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी अभिनेता सलमान खानलाही पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याची या धमकीप्रकरणी चौकशीही करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी या धमकीप्रकरणी सर्व खबरदारी बाळगली होती. धमकीचे पत्र सलमान खानच्या एका सुरक्षा रक्षकाला मिळाले होते. दरम्यान, आता सलमान खाननंतर राजस्थानमधील जोधपुर येथील त्याच्या वकिलांनाही धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगचे राजस्थान कनेक्शन पुन्हा उघड झाले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kill musawala salman khan filmmaker threatened bollywood mumbai print news ysh

Next Story
बाळासाहेब ठाकरे आरोग्यकेंद्रामध्ये रात्री १० पर्यत उपचार उपलब्ध; ऑगस्टपासून केंद्रे सुरू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी