scorecardresearch

किरकोळ वादातून एकाची हत्या

मित्राच्या वाढदिवसांच्या पार्टीत झालेल्या किरकोळ वादातून ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार विलेपार्ले येथे घडला.

किरकोळ वादातून एकाची हत्या
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मित्राच्या वाढदिवसांच्या पार्टीत झालेल्या किरकोळ वादातून ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार विलेपार्ले येथे घडला. सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी २४ तासांत आरोपीला अटक केली. मृत व्यक्ती भांडणात मध्यस्थी करीत होता. आरोपीने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

तक्रारदार सोहेल खुर्शिद अन्वर यांच्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी असल्यामुळे सर्वजण विलेपार्ले पश्चिम येथील एअरपोर्ट कॉलनी परिसरातील एका हॉलमध्ये रविवारी रात्री जमले होते. त्यावेळी अन्वर व आरोपी निखील वर्मा ऊर्फ कपाली यांच्यात भांडण सुरू झाले. वर्मा हा व्यायामशाळेत प्रशिक्षण देतो. त्याने अन्वरला लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. अन्वरला वाचवण्यासाठी सलीम शेख ऊर्फ रॉबरट ॲलेक्स टायटल (५०) धावून आले. त्यावेळी आरोपीने शेखलाही बेदम माहाण कली. भांडण थांबल्यानंतर शेखला रिक्षातून घरी घेऊन जात असताना बेशुद्ध पडला. त्याची पत्नी व मुलीने त्याला कुपर  रुग्णालयात दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. अन्वरच्या जबाबानंतर संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी तात्काळ वर्माला अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याच्या पोटात व छातीत आरोपीने गंभीर मारहाण केली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. याबाबतची माहिती मिळताच तत्रज्ञानच्या मदतीने तपास करून पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली. शेख यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप प्रलंबित असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या