मुंबई पोलिसांनी एसआरएमधून फाईल चोरी केल्याप्रकरणी प्रवीण कलमे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. तसेच प्रवीण कलमे देश सोडून गेल्याची माहिती असल्याने त्यांच्या विरोधात लूक आउट नोटीस देखील जारी करण्यात आली. एसआरएमधून फाईल चोरी केल्या संदर्भात प्रवीण कलमे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सडकून टीका केलीय. “प्रवीण कलमे उद्धव ठाकरे यांचा उजवा हात, अनिल परब यांचा चाहता आणि जितेंद्र आव्हाड यांचा सचिन वाझे आहे,” असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरीट सोमय्या म्हणाले, “प्रवीण कलमे म्हणजे उद्धव ठाकरे यांचा उजवा हात, अनिल परबचा चाहता आणि जितेंद्र आव्हाड यांचा सचिन वाझे आहे. अनेक वसुलीचे धंदे सुरू झाले होते. त्या प्रवीण कलमे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांना लूक आऊट नोटीस काढावी लागली. प्रवीण कलमेने सरकारी फाईली चोरल्या. उद्धव ठाकरे यांनी प्रवीण कलमेच्या तक्रारीवर सहा आदेश दिले होते. वेगवेगळे अधिकार, किरीट सोमय्या परिवार सगळ्यांविरोधा तक्रारी देण्यात आल्या होत्या.”

“आता दुबईत लपलेल्या प्रवीण कलमेला मुंबई पोलिसांना दुबईहून पकडून कोर्टात हजर करावंच लागणार आहे. उद्धव ठाकरे स्वतः प्रवीण कलमेला सरकारी फाईल चोरायला लावायचे. त्यांनी सगळ्यांकडून वसुलीचे धंदे सुरू होते. मागील ६ महिन्यांपासून आम्ही प्रवीण कलमेविरोधात कारवाईची मागणी करत होतो,” असंही किरीट सोमय्या यांनी नमूद केलं.

हेही वाचा : मला प्रश्न पडला आहे, आता किरीट सोमय्या काय करणार? संजय राऊतांचा खोचक सवाल

“प्रवीण कलमे यांनी एसआरएमधील सरकारी फाईल चोरल्या होत्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना अटक करू नये यासाठी फोन देखील केले होते. शेवटी अंत जवळ आला आहे,” अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya allegations on uddhav thackeray anil parab jitendra awhad about pravin kalame pbs
First published on: 02-07-2022 at 14:46 IST