राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आता महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावं जाहीर केली. यानंतर आता देशमुख-मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या यांनी चेंडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर, पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी आणि कोणाला आधी तुरुंगात पाठवायचं हे त्यांनीच ठरवावं, असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं. किरीट सोमय्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “”मी काय संजय राऊत नाही. चणेवाल्याकडे जाऊन दोन ट्रक रद्दीचे पेपर घेऊन जाणार. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचं नाव संजय राऊत सांगू शकले नाही. कुठे आहे वाधवान? असे फडतूस नाटकं, नौटंकी उद्धव ठाकरेंची माणसं करतात, आम्ही कागदपत्रांसह सांगतो. आता १२ नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काढू द्या. त्यांना ठरवू द्या कोणत्या नेत्याला आधी तुरुंगात पाठवायचं.”

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

“हे पवार आणि ठाकरेंना शोभतं का?”

“संजय राऊत अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देतात. किरीट सोमय्याला, पत्नीला आणि मुलाला जेलमध्ये टाकणार अशी धमकी दिली जाते. हे पवार आणि ठाकरेंना शोभतं का? आम्ही सर्व कुटुंब जेलमध्ये जायला तयार आहोत, पण हे डर्टी डझन महाराष्ट्राला लुटत आहेत. त्यांचा हिशोब होणार. डर्टी डझन ही केवळ १२ नावं नाहीत, तर त्यांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झालीय,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“उद्धव ठाकरे यांचा घोटाळा सिद्ध झालाय”

“उद्धव ठाकरे यांचा घोटाळा सिद्ध झालाय. मुख्यमंत्री गप्प बसले, हिंमत असेल तर उत्तर द्या. बायकोचं २०१९ चं बंगल्यासह ही जागा खरेदी केल्याचं पत्र खरं की पत्नीचं २०२१ चं आम्ही जागा घेतले तेव्हा बंगले नव्हते हे म्हणणं खरं? यातलं कोणतं पत्र खरं? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर उत्तर द्या. म्हणून धरणे धरू द्या, कितीही दबाव आणला तरी फरक पडणार नाही,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.

“देशमुख-मलिकांनंतर तुरुंगात जाण्यासाठी ‘डर्टी डझन’ रांगेत”

किरीट सोमय्या म्हणाले, “मविआचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झालीय. बेनामी रिसॉर्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू झालीय.”

“राऊतांच्या धडपडीवरून लक्षात येतं की आता कुणाची बारी”

“संजय राऊत यांच्या धडपडीवरून लक्षात येतं की आता कुणाची बारी आहे. त्यांचे पार्टनर सुजित पाटकर आहेत. कोविड हॉस्पिटल घोटाळा सिद्ध झाला आहे. यात उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुजित पाटकरला उत्तर द्यावं लागेल. भावना गवळी यांचा पार्टनर तर आतमध्ये आहे, आईचं नाव आरोपपत्रात आलं. आनंद आडसुळ यांच्याविरोधात आधीच अटक वॉरंट आहे,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“किती वेळा धरणे धरणार?”

“अजित पवार यांचा जरेंडेश्वर कारखाना केव्हा जप्त होणार याची मी वाट पाहत आहे. हसन मुश्रीफ आधीच संकटात आहेत. प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड यांचा यात समावेश आहे. हे किती वेळा धरणे धरणार?” असा सवालही सोमय्यांनी केला.

सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’मध्ये कोणाचा समावेश?

१. अनिल देशमुख
२. नवाब मलिक
३. अनिल परब
४. संजय राऊत
५. सुजित पाटकर
६. भावना गवळी
७. आनंद आडसुळ
८. अजित पवार<br>९. हसन मुश्रीफ
१०. प्रताप सरनाईक
११. रविंद्र वायकर
१२. जितेंद्र आव्हाड

हेही वाचा : “पोलिसांवर विश्वास ठेवून चालणार नाही, CISF ने सांगितलेले…”, देवेंद्र फडणवीस यांचा किरीट सोमय्या यांना सल्ला

“दोन गेले, १० जणांवर कारवाई सुरू”

“मविआचे १२ नेते कारवाईच्या रांगेत आहेत. ते कितीवेळा दबाव आणणार? पत्रकाराने सकाळी विचारलं ‘अब किस की बारी है’ मी म्हटलं चिट्ठी टाकावी लागेल. दोन गेले, १० जणांवर कारवाई सुरू आहे,” असंही सोमय्यांनी म्हटलं.