scorecardresearch

कर्जतला का जाताय? किरीट सोमय्या म्हणाले, “मला नवाब मलिक यांना ‘गिफ्ट’ द्यायचंय, त्यांनी…”

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ‘गिफ्ट’ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे जात असल्याचं वक्तव्य केलंय.

nawab-malik-kirit-somaiya1
नवाब मलिक आणि किरीट सोमय्या (संग्रहित छायाचित्र)

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ‘गिफ्ट’ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे जात असल्याचं वक्तव्य केलंय. नवाब मलिक बीड जिल्ह्यातील देवस्थान जमिनीची चौकशी करणार म्हणतात. मात्र, बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलाय. तसेच मलिकांना कर्जतमधील देवस्थान जमिनीचं गिफ्ट देणार असल्याचा इशारा दिली. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “नवाब मलिक यांना मला काहीतरी भेट/बक्षीस (गिफ्ट) द्यायचं आहे. त्यांनी गेल्या महिन्यात असं काही सांगितलं की बीड जिल्ह्यात देवस्थानाची जमीन कुणाला तरी दिली गेली याची चौकशी करणार आहोत. खरं म्हणजे देवस्थानाची जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ली. परंतु आता रायगडमधील कर्जत येथे देवस्थानच्या जमिनीचे सातबारा माझ्या हातात आले आहेत. आज मी जाऊन ते कन्फर्म करणार आहे. तसेच या देवस्थानची जमीन या व्यक्तीवर कशी गेली याची चौकशी झाली पाहिजे.”

“शिवसेना नेत्यांना १०० कोटी रुपयांची खिरापत वाटण्यात आली”

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचं कारण काय तर सगळ्या सेना नेत्यांना खिरापत वाटायची. कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट असो, खाण्याचं असो किंवा आरटीपीसीआरचं असो यात सेना नेत्यांना खिरापत वाटण्यात आली. मुंबई, पुणे, ठाणे या भागातील ७ केंद्र बोगस कंपन्यांना देण्यात आली. १०० कोटी रुपयांची खिरापत वाटण्यात आली. त्या घोटाळ्याचे कागदपत्रं माझ्यासमोर आलेत. ते मी राज्य सरकारलाही देणार आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

हेही वाचा : “दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार”, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

“हे ठेके अशा लोकांना दिल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यावर भाजपा एक ‘ब्लॅक पेपर’ प्रकाशित करणार आहे. तसेच राज्यपालांकडे याची चौकशी करण्याची विनंती करणार आहे,” अशी माहिती सोमय्यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kirit somaiya say going to karjat raigad for giving gift to nawab malik pbs

ताज्या बातम्या