“एकदा तरी उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता”; सोमय्यांच्या पत्नीचा राऊतांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा

संजय राऊत यांनी माफी कशी मागावी याची तयारी सुरु केली पाहिजे, असेही सोमय्या म्हणाले

Kirit Somaiya wife files defamation suit of Rs 100 crore against Sanjay Raut

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन हा दावा दाखल केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना माफी मागावी लागेल असे म्हटले आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माफी कशी मागावी याची तयारी सुरु केली पाहिजे. मेधा किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. शिक्षा किती होणार हे न्यायालय ठरवणार आहे. आम्हाला एक पैसा नकोय. ते सर्व धर्मादाय संस्थांना द्यावा. पण महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची माफी हवी आहे. एकदा तरी उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता. म्हणून महाराष्ट्राच्या नागिकांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पापाचे फळ इथे मिळेल,” असे किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांची माफी मागावी असे सोमय्या म्हणाले होते. तसे न केल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. सध्या तरी संजय राऊत यांनी या मुद्द्यावर माफी मागितलेली नाही. याआधी मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kirit somaiya wife files defamation suit of rs 100 crore against sanjay raut abn

Next Story
“ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात महाराष्ट्राच्या अ‍ॅडव्होकेट जनरलांच्या चुका, पण…”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी