शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. तसेच एकनाथ शिंदे गटात सामील झाले. यानंतर शिवसेनेच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. “दोन दिवसांपूर्वी रामदास कदम पोरं कुठं जायची ती जाऊदे, मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील म्हणत होते. आज तेच मातोश्रीसह उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करत आहेत,” असा आरोप पेडणेकरांनी केला.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “प्रत्येक शिवसैनिक रामदास कदम यांना भाई म्हणत असे. ज्या दिवसापासून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून ते पक्षाच्या मोठ्या पदावरच राहिले. २० वर्षे आमदारकी भेटली. मुलाला आमदारकी, त्यांना विधान परिषद मिळाली. शिवसेनेमधून ते निवडून गेले. असं असताना ते मधल्या काळात बरं नाही, बरं नाही या सबबीखाली लोकांपासून दूर राहायला लागले. मी त्यांच्या दोन्ही मुलांना बाबा कसे आहेत? आमदार कोण आहे असे प्रश्न विचारायचे.”

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

“मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील, पोरं कुठं जायची ती जाऊदे”

“जेव्हा जेव्हा आम्ही गोरेगावमध्ये गेलो तेव्हा तेव्हा रामदास कदम यांना भेटायला गेलो. मात्र, रामदास कदम यांच्यातील ‘भाई’ने या वयात काय केलं? दोन दिवसांपूर्वी म्हणाले मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील. पोरं कुठं जायची ती जाऊदे, पण मी शिवसेनेतच राहील असं म्हणत होते,” असं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं.

“शिवसेनेत सगळेच राबतात, सगळ्यांना कुठे आमदारकी मिळते”

किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, “आम्ही कोणाचा आदर्श ठेवायचा? निष्ठावंत म्हणून कुणाकडे बघायचं? शिवसेना सोडून जायचं असेल तर नक्की जा, पण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी पदं दिली, त्याचा मान ठेवा. शिवसेनेत सगळेच राबतात, सगळ्यांना कुठे आमदारकी मिळते. सगळ्यांनाच कुठे तुमच्यासारख्या पायघड्या घातल्या जातात.”

“असं करु नका, समस्त शिवसैनिकांना प्रचंड राग येतोय”

“तुम्हाला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणायचं नव्हतं, तर म्हणू नका. आदित्य ठाकरेंनी कधीच त्यांना साहेब म्हणायला सांगितले नाही. ते तुमच्याच विभागाचे मंत्री झाले आणि त्यांनी ते नावारुपाला आणलं. ते तुमच्याकडे बसून शिकत होते असं तुम्ही म्हणता. म्हणजेच ते शिवसैनिक म्हणून तुमच्याकडूनही शिकले. मात्र, तुम्हाला त्याचीही कदर नाही. असं करु नका. समस्त शिवसैनिकांना प्रचंड राग येतोय,” असा इशारा त्यांनी कदमांना दिला.

हेही वाचा : “शिवसेना फोडण्यामागे शरद पवार, अजित पवार”; रामदास कदमांच्या आरोपाला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले…

“तुमच्या वाट्याला चिखलच येणार”

“तुम्हाला जायचं असेल तर जा, पण मातोश्रीवर, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करू नका. तुम्ही जेथे जात आहात ते कमळ चिखलात आहे आणि हाच चिखल तुमच्या वाट्याला येणार आहे,” असंही पेडणेकर म्हणाल्या.