दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे. दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू असताना काल शिवसेनेच्यावतीने पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्कवर पोहोचण्यासाठी शिवसैनिकांची कोंडी करण्यात येण्याची शक्यता शिवसेनेकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात मुंबईच्या माजी महापैर किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. शिवसैनिक हूशार असून शिवतीर्थावर कसं पोहोचायचं हे त्यांना माहिती आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – धनंजय मुंडे म्हणाले ‘आम्ही आता आम्ही भाऊ-बहीण नाही’, पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या “रक्ताचं नातं…”

”गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिका शिवतीर्थावर बाळासाहेब आणि आता उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी येतो आहे. पिढ्यांपिढ्या ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे आम्हाला शिवसैनिक येतील की नाही, याची चिंता नाही. कितीही अडचणी आल्या तरी आमचा शिवसैनिक बरोबर शिवतीर्थापर्यंत पोहोचणार आहे”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा – “एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार? विचारल्यावर अजित पवारांनी हसत दिलं भन्नाट उत्तर

”आम्हाला मैदान मिळू नये म्हणून ज्याप्रकारे आमची कोंडी करण्यात आली होती, तशीच कोंडी आता शिवसैनिक शिवाजी पार्कवर पोहोचून नये, यासाठी होण्याची शक्यता आहे. पण मला विश्वास आहे की यंदा नेहमीपेक्षा जास्त गर्दी असेल. शिवसैनिक हूशार आहे, तो कसाही करून शिवतीर्थावर पोहोचेल. असेही त्या म्हणाल्या.