मुंबई : ओठांचे चुंबन घेणे आणि लैंगिक अवयवाला स्पर्श करणे हा अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला नुकताच जामीन मंजूर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७७ नुसार (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि मुलाच्या जबाबानुसार, आरोपीने त्याच्या ओठांचे चुंबन घेतले आणि त्याने त्याच्या गुप्तांगाला स्पर्श केला. आपल्या मते सकृद्दर्शनी आरोपीचे हे कृत्य अनैसर्गिक लैंगिक गुन्हा होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kissing fondling not unnatural bombay hc grants bail to accused man zws
First published on: 16-05-2022 at 03:48 IST