VIDEO: टॅक्सीडर्मी म्हणजे काय ? भारतात ही कला लोप पावण्याचं कारण काय?

टॅक्सीडर्मी ही कला भारतात लोप पावत चाललीये. मात्र एका अवलियाने ही कला जिवंत ठेवली आहे. या कलेच्या माध्यमातून त्यांनी हजारो पशु पक्षी आणि प्राण्यांमध्ये प्राण फुंकले आहेत.

Taxidermy
भारतामध्ये टॅक्सीडर्मी या कलेच्या माध्यमातून मृत्यू प्राण्यांचे जतन केले जाते.

भारतामध्ये अनेक दुर्मिळ प्राणी पक्षी आहेत. मेल्यानंतर या प्राण्यांचे जतन कसे करायचे हा प्रश्न उपस्थित होतो. या मृत प्राणी – पक्षांच्या जतन करण्याच्या पद्धतीला टॅक्सीडर्मी म्हणतात. भारतामध्ये टॅक्सीडर्मी या कलेच्या माध्यमातून मृत प्राण्यांचे जतन केले जाते आणि संपूर्ण भारतात ही कला जतन करणारे डॉ. संतोष गायकवाड एकमेव टॅक्सीडर्मी लॉजिस्ट आहेत. तर जाणून घेऊया या कलेविषयी…

प्राणी-पक्षांचा मृत्यू झाला तर अनेक प्राणीप्रेमी व पर्यटक हळहळ व्यक्त करतात. त्याचवेळी डॉ गायकवाड यांच्या सारखे डॉक्टर पुढे येऊन त्या प्राण्यावर प्रक्रिया करून त्यामध्ये जिवंतपणा आणतात आणि तेच प्राणी पर्यटकांचे आकर्षण ठरतात. पण या कलेकडे दुर्लक्ष होत असल्याने ही कला लयाला जात असल्याची भीती डॉक्टर व्यक्त करत आहेत आणि त्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन डॉक्टर संतोष गायकवाड यांनी केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Know about the art called taxidermy pvp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प