मुंबई : प्रवाशांचा रेल्वे प्रवास आरामदायी, वेगवान आणि आकर्षक व्हावा यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमधून इच्छितस्थळी जलदगतीने पोहचता येते. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वंदे भारताचा वेग मंदावणार असून सुमारे ८ तासांच्या प्रवासासाठी १० तास लागणार आहेत.

गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्स्प्रेसला प्रचंड प्रतिसाद असतो. त्यामुळे या काळात प्रवाशांचा प्रवास दोन तासांनी वाढणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. मुसळधार पाऊस आणि आपत्कालीन घटनांच्या शक्यतेमुळे रेल्वेगाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होतो. याचा सर्वाधिक फटका अति जलद रेल्वेगाड्यांना बसतो.

A quarter three hundred acres of additional land for Dharavi rehabilitation Mumbai
धारावी पुनर्वसनासाठी आतापर्यंत सव्वातीनशे एकर अतिरिक्त भूखंड!
superfast express trains
कोकण रेल्वे मार्गावरील तीन अतिजलद एक्स्प्रेस दादरपर्यंत धावणार
Pune Metro, Swargate,
पुणे मेट्रो सुसाट…! स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त अखेर ठरला
Traffic congestion continues on Ghodbunder road
घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी कायम; बंदी असतानाही अवजड वाहनांच्या घुसखोरीने एक किलोमीटरसाठी दोन तास
Congestion, Ghodbunder road,
ठाणे : जड-अवजड वाहनांमुळे घोडबंदर मार्गावर कोंडी, एक किलोमीटर अंतर गाठण्यासाठी दोन तास
Success Story Satyanarayan Nuwal's tough journey
Success Story: स्वप्नांपुढे सारे फिके! रेल्वेस्थानकावर झोपण्यापासून ते ९२,००० कोटींची कंपनी उभारण्यापर्यंतचा सत्यनारायण नुवाल यांचा खडतर प्रवास
railway passengers, TTE, coaches,
रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली, टीटीईंवर आता तीन डब्यांऐवजी…
Konkan Railway, fine,
कोकण रेल्वेत दर दिवशी विनातिकीट प्रवाशांकडून नऊ लाख रुपये दंड वसूल

हेही वाचा…लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर; ६, ७ आणि १३ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

तसेच मुंबई – गोव्यादरम्यानचा प्रवास वेळेत आणि वेगात होण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावेल. कोकणात जाणाऱ्यांची संख्या गणेशोत्सव काळात अधिक असते. त्यामुळे या काळात प्रवाशांचा वेगवान प्रवासाची इच्छा अपूर्णच राहणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

पावसाळी वेळापत्रक वगळता मुंबई – गोवा सुमारे ५८६ किमी अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेला ७.४५ तास लागतात. गाडी क्रमांक २२२२९ / २२२३० वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि मडगाव येथे दुपारी १.१० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दुपारी २.४० वाजता सुटेल आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.

हेही वाचा…मुंबई : खासगी विकासक, बँक, दलालांची मदत न घेता इमारतीचा पुनर्विकास

पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई – गोवा अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसला सुमारे १० तास लागतात. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.२५ वाजता मुंबईमधील सीएसएमटीला पोहोचेल. दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी येथे थांबे देण्यात येतील.