कोकण, प. महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी १०० कोटी मंजूर

मुंबई- गोवा महामार्गावर असलेल्या चिपळूणनजीकच्या वाशिष्ठी पुलाचे या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अभूतपूर्व अशा पावसामुळे बाधित झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारने १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले.

मुंबई- गोवा महामार्गावर असलेल्या चिपळूणनजीकच्या वाशिष्ठी पुलाचे या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते, मात्र तो ७२ तासांच्या आत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, असे गडकरी म्हणाले.

अभूतपूर्व अशा पावसामुळे बाधित झालेले कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्ते पुन्हा बांधण्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी ५२ कोटी रुपये तात्पुरत्या दुरुस्तीसाठी, तर ४८ कोटी रुपये कायमस्वरूपी पुनर्बांधणीसाठी आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Konkan western maharashtra 100 crore sanctioned roads union minister nitin gadkari akp

ताज्या बातम्या