कोयना एक्स्प्रेसची रेल्वे कर्मचाऱयांना धडक; चार ठार

कोयना एक्स्प्रेच्या धडकेत रेल्वेच्या चार कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. कोयना एक्स्प्रेस आपल्या नेहमीच्या वेळे प्रमाणे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती.

कोयना एक्स्प्रेच्या धडकेत रेल्वेच्या चार कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. कोयना एक्स्प्रेस आपल्या नेहमीच्या वेळे प्रमाणे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. रेल्वे मार्गात हे चार कर्मचारी आल्याने त्यांच्या जागीच दुर्देवी अंत झाला. रेल्वे अत्यावश्यक सेवा आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Koyna express hit four railway workers to death