दाल मखनीचा फोटो शेअर करत क्रांती रेडकरचा नवाब मलिकांवर निशाणा; म्हणाली, “उद्या कुणी आरोप…”

क्रांती रेडकरने ट्विट करत नवाब मलिकांना उत्तर दिले आहे.

nawab malik on letter written to cm uddhav thackery by Sameer wankhede wife kranti redkar

मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात नव्याने आरोप केले. यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या महागड्या लाइफस्टाइलवर प्रश्न चिन्हं उभे केले. त्यानंतर नवाब मलिक यांच्या आरोपांना समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. समीर वानखेडे यांच्या महागड्या लाइफस्टाइलवरून मलिकांनी टीका केली होती. त्यावर क्रांती रेडकरने ट्विट करत मलिकांना उत्तर दिले आहे.

“आमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी डाळ मखनी आणि जिरा राईस होता. राईस घरी बनवला होता, तर दाल मखनी बाहेरून मागवली होती आणि त्याची किंमत १९० रुपये होती. उद्या सकाळी सरकारी अधिकार्‍याच्या कुटुंबीयांनी ते खाल्ल जे त्यांनी खायला नको होतं, असा आरोप कुणी करू शकतं, त्यामुळे मी पुराव्यांसह मीडियाला माहिती देतेय,” असं म्हणत क्रांतीने नवाब मलिकांना टोला लगावला आहे.

नवाब मलिकांचे आरोप काय?

समीर वानखेडेंनी हजारो कोटींची वसूली केली आहे याची चौकशी व्हायला हवी असे नवाब मलिकांनी म्हटले आहे. “एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल. या सर्व काळात त्यांनी जशाप्रकारचे कपडे घातलेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे. काय प्रामाणिक अधिकारी १० कोटींचे कपडे घालत असतील का? समीर वानखेडेंनी कोणतेही शर्ट पुन्हा घातलेले पाहिले नाही. दोन लाखांचे बुट घालणारा असा प्रामाणिक अधिकारी कोणी नसेल. आम्ही प्रार्थना करतो की देशातील सर्व प्रामाणिक अधिकाऱ्यांची अशाच प्रकारे प्रगती व्हावी,” असे मलिकांनी म्हटले आहे.

हेही वाचा – “समीर वानखेडेंची सर्व संपत्ती त्यांच्या..”; क्रांती रेडकरचे नवाब मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kranti redkar shares dal makhani photo bill over nawab malik allegations hrc

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या