मुंबईत चार कोटी किमतीचे ७०० ग्रॅम हेरॉईन सापडल्याप्रकरणी गुजरातमधल्या एकाला अटक

चौकशीनंतर प्रसादला अटक करण्यात आली असून त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने गुरुवारी मुंबई विमानतळाजवळील कार्गो कॉम्प्लेक्समधून ४ कोटी किमतीचे ७०० ग्रॅम हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला अटक केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईच्या उपनगरातील इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर एका पार्सलमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो झोनल युनिटला मिळाली होती.

त्यानुसार सोमवारी कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमध्ये झडती घेतली असता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांना एका पॅकेटमध्ये ७०० ग्रॅम पांढरी पावडर आढळून आली, हे हेरॉईन असून याची कथित बेकायदेशीर बाजारात अंदाजे ४ कोटी रुपये किंमत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पार्सलचा प्रेषक, वडोदरा येथील रहिवासी कृष्णा मुरारी प्रसाद याला गुरुवारी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कार्यालयात आणले आहे, असे त्यांनी सांगितले. .

चौकशीनंतर प्रसादला अटक करण्यात आली, अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Krishna murari prasad arrested in a rs 4 crore heroin drug haul at vile parle vsk

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या