Kurla Bus Accident news Update : मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात काल रात्री (९ डिसेंबर) झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. तर ४० हून जास्त नागरिक जखमी झाले आहेत. कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा अपघात झाला. ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. दरम्यान या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल हृदय पिळवटून टाकणारी माहिती आता समोर येत आहे.

वडीलांनी स्टेशनपर्यंत चालत यायला सांगितलं…

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये १९ वर्षीय आफरीन शेख या तरुणीचा देखील समावेश होता. आफरीनचा पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस होता. काम संपवून ती घरी परतत होती. पण तिला रिक्षा मिळत नव्हता म्हणून तिने वडील अब्दुल सलीम यांना फोन केला. सलीम यांनी तिला चालत कुर्ला स्टेशनपर्यंत येण्यास सांगितलं. थोड्याच वेळात सलीम यांना आणखी एक फोन आला, यावेळी मात्र फोनवर बोलणाऱ्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात येण्यास सांगितलं. येथे त्यांना आफरीनचा मृतदेह सोपवण्यात आला.

Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना

एकीकडे आफरीन तीचं काम संपवून घरी परतत होती तर ५५ वर्षीय नर्स कन्निस अन्सारी या त्यांच्या नाईट शीफ्टसाठी रुग्णालयात जात होत्या. तेव्हा हा भीषण अपघात घडला. त्यांना मृत अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.

बेस्ट बसच्या या हादरवून सोडणाऱ्या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला आणि इतर ४३ लोक जखमी झाले. एसजी बर्वे रोडवर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावर चालणार्‍या नागरिकांना आणि वाहनांना धडक दिली. आफरीन आणि कन्निस यांच्यासह अनाम शेख, शिवम कश्यप, विजय गायकवाड आणि फारुक चौधरी यांचादेखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

हेही वाचा>> Best Bus Accident : “सुरुवातीला बेस्ट बसने तीन रिक्षा आणि काही लोकांना उडवलं आणि…”; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

चालकाचे नियंत्रण सुटलेली ही बस अखेर एका सोसायटीमध्ये दाखल झाली आणि थांबली. दरम्यान बसची पहाणी केली असून या तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर बसमध्ये काही बिघाड झाला होता का? याबद्दल अधिकची स्पष्टता मिळेल. बेस्ट प्रशासनकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलीसांनी रात्रीच बस चालक संजय मोरेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

या दुर्घटनेनंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. याबरोबरच ५ लाख रूपयांची मदत पीडितांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी दुर्घटनेत जखमींच्या उपचाराचा खर्च प्रशासन उचलणार असल्याचे सांगितले आहे.

Story img Loader