रेल्वेवर दगडफेक करणाऱ्यास अटक

अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राकेश धरमसिंग रोड असून तो कचरा वेचण्याचे काम करतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : उपनगरी रेल्वेवर दगडफेक करणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राकेश धरमसिंग रोड असून तो कचरा वेचण्याचे काम करतो.

कुर्ला ते विद्याविहार, टिळकनगर स्थानकादरम्यान बुधवारी दुपारी पावणेचारनंतर सीएसएमटी ते खोपोली जलद उपनगरी रेल्वे, सीएसएमटी ते आसनगाव जलद, सीएसएमटी ते कल्याण धीमी व सीएसएमटी ते पनवेल उपनगरी रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये पाच प्रवासी जखमी झाले. यातील चार प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर घटनास्थळी जाऊन कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी शोध घेतला. त्यांनी ३५ वर्षीय राकेश रोड नावाच्या व्यक्तीला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.आय. इनामदार यांनी सांगितले की, राकेश मूळचा हरयाणातील आहे. तो विद्याविहार ते नाहूरदरम्यान कचरा वेचण्याचे काम करतो. मंगळवारी घडलेल्या घटनेतही त्यानेच दगडफेक केल्याचे समोर आले असून अधिक चौकशी सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kurla railway police detained man for pelting stones at local train zws