संसदेत होणारी चर्चा ही सामाजिक हितासाठीच असते. तसेच संसदेबाहेर होणारी चर्चा देखील महत्त्वाची असते. ती ऐकूण घेण्याची क्षमता मोठ्या नेत्यामध्ये असणे हा चांगला गुण आहे. मात्र केंद्र सरकारमध्ये ऐकण्याची क्षमता कमी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या एबीपी माझासोबत बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संसदेत होणारी चर्चा ही सामाजिक हितासाठीच असते. आताच्या सरकारने आम्ही सुचवलेले मुद्दे मान्य केले तर समाजासाठी चांगलं होईल. संसदेत चर्चा होतेच, मात्र त्याबाहेर होणारी चर्चा देखील महत्त्वाची असते. ऐकूण घेण्याची क्षमता मोठ्या नेत्यामध्ये असणे हा चांगला गुण आहे.”

पण राजकीय द्वेष असायला नको

“राजकीय मतभेद असलेच पाहिजे, पण राजकीय द्वेष असायला नको. अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह, राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात विरोधकांनी सूचवलेल्या दुरुस्त्यांचा आनंदाने स्वागत केलं जात होतं.” मात्र, आता तसे होत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नरेगा योजना राज्याने देशाला दिली

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माहाराष्ट्राचे कौतुक केले. राज्यातील प्रकल्प, उद्योग धंदे, सहकारी बँकांची यश्वसी वाटचाल त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी नरेगा योजनेवरुन केंद्रावर निशाणा साधला. महाराष्ट्राने नरेगा योजना देशाला दिली. २०१४ च्या निवडणुकीत सध्या केंद्रात असलेल्या सरकारने राज्याच्या या योजनेला विरोध करण्यात आला. मात्र करोना काळात ही योजना सर्वात यश्वस्वी राहीली. रोजगार हमी योजना देखील महाराष्ट्राने देशाला दिली आहे. ज्याचं काम देशभरात दिसत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.