मुंबई : नवी मुंबईमधील खारघर येथे रविवारी एक सोनेरी कोल्हा (गोल्डन जॅकल) मृतावस्थेत आढळला असून त्यामुळे सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास, संवर्धन आणि संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खारघरच्या आसपास पाणथळ आणि कांदळवन क्षेत्र असल्याने तेथे सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आहे. मात्र, सरकारने आजतागायत सोनेरी कोल्ह्यांचे सर्वेक्षण, संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

नवी मुंबई परिसर पाणथळ जागा आणि कांदळवन क्षेत्रासाठी ओळखला जातो. आजघडीला गर्दीने गजबजलेल्या नवी मुंबईत एकेकाळी घनदाट जंगल होते. असंख्य पशु-पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळत होत्या. कालांतराने येथे नमुष्यवस्ती वाढली, मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली. असे असले तरी आजही तेथे काही वन्यप्रजाती वाढत असून या वन्यप्रजाती शहरीकरणाला तोंड देत तग धरून आहेत. त्यापैकीच एक दुर्मीळ असा सोनेरी कोल्हा. सोनेरी कोल्हा (कॅनिस ऑरियस) युरोप, आफ्रिका, आशियाच्या काही भागात आढळतो. कांदळवन हा या कोल्ह्यासाठी सुरक्षित अधिवास आहे. आजही नवी मुंबईतील कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हा आढळतो. कांदळवन परिसंस्थेतील हा प्रमुख सस्तन प्राणी असून नवी मुंबई परिसरात त्यांचा अधिवास आहे. याबाबत अद्याप नियोजनबद्ध सर्वेक्षण झालेले नाही किंवा त्यांच्या संवर्धनासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

Gold crown stolen from Pune, Zaveri Bazar, Pune,
पुण्यातून चोरलेल्या सोन्याच्या मुकुटाची मुंबईतील झवेरी बाजारात विक्री
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
The hyena pulled the lion's tail
“एखाद्याच्या संयमाचा अंत पाहू नका”, तरस प्राण्यानं डिवचलं म्हणून सिंह चवताळला, पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Animal morgue to open in Malad Mumbai print news
मालाडमध्ये प्राण्यांचे शवागार सुरू होणार; येत्या महिनाभरात सुविधा उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस
nagpur 10 gram gold price
सुवर्णसंधी! सोन्याचा भाव पुन्हा उतरला… तीनच दिवसांत…
fox released into forest
Video: मरणासन्न अवस्थेत सापडला ३२० ग्रॅमचा कोल्हा….पण, आठ महिन्यांनी उड्या मारत….
tiger attack Chandrapur
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
vulture Chandrapur marathi news
‘त्या’ गिधाडांना झाले तरी काय? एकापाठोपाठ एक…

खारघर परिसरात रविवारी सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळला होता. तसेच काही वर्षांपूर्वी खारघरमध्ये सोनेरी कोल्ह्याचे अवशेष आढळले होते. कोल्ह्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने त्याचा नेमका कशामुळे मृत्यू झाला याचे कारण समजू शकले नाही. खारघरमध्ये यापूर्वीही रहिवाशांना सोनेरी कोल्ह्यांचे दर्शन घडले होते. मात्र नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने वारंवार वन्यजीव नागरी वस्तीमध्ये दिसत आहेत. यापूर्वी खारघरमध्ये कोल्हा मृतावस्थेत आढळल्यानंतर पर्यावरण अभ्यासकांनी वन्यजीव सुरक्षेसाठी विविध सरकारी यंत्रणांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा >>>राज्यात गुरुवारपासून हलक्या

त्रोटक माहिती सोनेरी कोल्ह्यांची संख्या, तुलनेत त्यांच्याविषयी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील कांदळवन परिसरात आढळणाऱ्या सोनेरी कोल्ह्यांचे वास्तव्य, त्याचे खाद्या आदींचा अभ्यास कांदळवन प्रतिष्ठान आणि खासगी संस्थांतर्फे करण्यात आला आहे. मुंबईचा पश्चिम किनारा, मध्य मुंबईत, नवी मुंबईतील काही भाग आणि ठाणे खाडीच्या आसपास असलेल्या कांदळवनामुळे जैवविविधतेला मोठ्या प्रमाणावर आधार मिळाला आहे. कांदळवनामुळे स्थलांतरित पक्षी, वेगवेगळे वन्यप्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीव आढळून येतात. त्यापैकीच एक सोनेरी कोल्हा दृष्टीस पडतो. सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास कमी होत असल्याने त्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. अनेक वेळा विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली, ऐरोली येथील मानवी वस्तीत सोनेरी कोल्हा शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

खारघर परिसरात रविवारी सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळला होता. तसेच काही वर्षांपूर्वी खारघरमध्ये सोनेरी कोल्ह्याचे अवशेष आढळले होते. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

‘एमएमआर’मध्ये खारफुटी व पाणथळ जागांकडे दुर्लक्ष ही एक मोठी समस्या आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सिडको व इतर सरकारी यंत्रणांनी खारफुटीचे मोठे भाग संवर्धनासाठी वनविभागाकडे सुपूर्द केलेले नाहीत. भूमाफिया अतिक्रमण करीत आहेत. सरकारने हस्तक्षेप करून सर्व खारफुटी तातडीने वनविभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी.  – बी. एन. कुमार, पर्यावरण अभ्यासक

Story img Loader