यावर्षी राज्य सरकारने सर्व करोना निर्बंध मागे घेतल्यामुळे राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. यंदा गणेश मंडळांना मिरवणुकीची परवानगी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थी अगोदरच लाल बागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. लालबागच्या राजाची पहिली झलक पाहताना गणेशभक्तांमधील उत्साह ओसंडून वाहत होता.

हेही वाचा >>> ऑनलाईन गणेश पूजनाला गणेश भक्तांची सर्वाधिक मागणी ; डोंबिवलीतून बुधवारी सकाळी १०.३० वाजता थेट गणपती पूजन प्रक्षेपण

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Daighar Garbage, Daighar, Thane,
ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी

येत्या ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवाची धूम असणार आहे. मुंबईसह सर्वच गणेश मंडळांनी त्यासाठी खास तयारी केली आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. याच कारणामुळे या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भगणेशभक्त येथे हजेरी लावतात. दरम्यान, आज (२९ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक सार्वजनिक करण्यात आली. यावेळी गणेश भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा देत गणेशाचे स्वागत केले.

हेही वाचा >>> Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पासाठी बनवा हा खास शिरा; मधुमेह असणाऱ्यांना सुद्धा चाखता येणार आस्वाद

लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी राज्यातील गणेशभक्त उत्सुक असतात. या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी हराजो भाविक रांग लावतात. यावर्षी लालबागच्या राजाचे मुखदर्शन ऑनलाईन पद्धतीनेही करता येणार आहे. ‘लालबागचा राजा’च्या ऑफिशियल फेसबुक, यूट्यूब पेजवर मुखदर्शन करता येईल.

लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यााठी खलील लिंकवर क्लीक करा.

लालबागचा राजा Youtube LIVE

लालबागचा राजा Facebook LIVE

यंदा ३१ ऑगस्टला बाप्पा घरोघरी येणार आहेत. त्यासाठीची जोरदार तयारी सुरू आहे. गणेश मंडळे देखावे तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठीच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत.