मुंबईत अ‍ॅंटॉप हिलमध्ये दरड कोसळून दोघांचा बळी

मुंबईतील अ‍ॅंटॉप हिल परिसरात दरड कोसळून बुधवारी सकाळी दोघांचा बळी गेला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे.

मुंबईतील अ‍ॅंटॉप हिल परिसरात दरड कोसळून बुधवारी सकाळी दोघांचा बळी गेला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. अजून चार ते पाच जण मातीच्या ढिगाऱयाखाली सापडल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या भागात दरड कोसळली.
दरडीचा ढिगारा हटविण्यासाठी अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी अ‍ॅम्ब्युलन्सही दाखल झाली आहे. मुंबईमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.
(संग्रहित छायाचित्र)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Landslide in antop hill area of mumbai