मुंबई- गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली असून सध्या रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरड कोसळ्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरु आहे. दरड कोसळ्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वाहतूक तात्पुरती चिरणीमार्गे वळवण्यात आली

thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
proposal for widening of uran to panvel road
उरण-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव, नवघर फाटा ते बोकडवीरा पोलीस चौकीपर्यंत चौपदरी मार्ग
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

दरड कोसळ्यानंतर काही काळ मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, या महामार्गावर पुन्हा दरड कोसळ्याची शक्यता असल्यामुळे ही वाहतूक तात्पुरती चिरणीमार्गे वळवण्यात आली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण

पाऊस सुरू झाल्यापासून घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. शनिवारी रात्री साडेदहा वाजता परशुराम घाटातील देवाची पायवाट या ठिकाणी मातीचा डोंगर रस्त्यावर आला त्यामुळे पूर्ण रस्त्यावर माती पसरली होती. चौपदरीकरणाच्या कामासाठी एप्रिल आणि मे महिन्यात घाट दिवसभर बंद करण्यात आला होता. पण ते जेमतेम ६० टक्के झाले आहे. या दरम्यान घाटातील धोकादायक डोंगरकटाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे.