‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये शुक्रवारी नवा लेख

महाराष्ट्राची ज्ञानप्रबोधनाची परंपरा जपण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना लिहिते करणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेमध्ये गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या ‘ब्लॉग’वर विद्यार्थ्यांना आज (गुरूवारी) रात्रीपर्यंत व्यक्त होता येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या नव्या आणि ताज्या विषयावर विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी मिळेल.या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागातून भरभरून प्रतिसाद दिला आहे. विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहिताना येणाऱ्या कळफलकाच्या (किबोर्ड) अडचणी दूर करण्यात आल्या असून त्यांना निर्भिडपणे व मनमोकळेपणाने आपली मते मांडता येणार आहेत.

लक्षात ठेवावे असे..

  • या स्पर्धेकरिता दर आठवडय़ाला शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली एक नवीन लेख प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांना गुरूवापर्यंत आपल्या प्रतिक्रिया नोंदविता येतील.
  • स्पर्धेचे स्वरूप आणि सहभागी होताना काय करायचे याचा तपशील indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावरील एफएक्यू’मध्ये देण्यात आला आहे.
  • लेखावर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी लेखाच्या शेवटी असलेल्या ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली असलेल्या ‘तुमची प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे लॉग इन करा’ या शीर्षकाखाली क्लिक करून तुमचे लॉग इन करून प्रतिक्रिया नोंदवायची आहे.
  • या लेखावर विद्यार्थ्यांना गुरूवापर्यंत आपल्या सवडीप्रमाणे ५०० ते ७०० शब्दांत लेखावरील किंवा त्या विषयावरील त्याची प्रतिक्रिया नोंदवायची आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना अपूर्ण माहिती भरली आहे, ते विद्यार्थी संकेतस्थळावर त्यांचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून इतर माहिती भरू शकतात.
  • या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सात हजारांचे तर दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला पाच हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
  • लॉग इन करताना तांत्रिक अडचणी येत असल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com  या ई-मेलवर संपर्क साधावा.