मुंबई : वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आली. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिषदेच्या तीन सदस्यीय शिस्तपालन समितीने सदावर्ते यांना वकील कायद्याच्या कलम ३५ नुसार गैरवर्तणुकीप्रकरणी दोषी ठरवले. तसेच दोन वर्षांसाठी त्यांची सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला. सदावर्ते यांना आदेशाची प्रत मिळाल्याच्या दिवसापासून आदेशाची अंमलबजावणी सुरू होईल, असे परिषदेने भारतीय वकील परिषदेला ई-मेलद्वारे कळवले आहे.  महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला होता.

हेही वाचा >>> आघाडीच्या एकजुटीसाठी काँग्रेसकडून ‘सावरकर’ मुद्दा बाजूला, सभांमधून भाजप-शिंदे गटाला प्रत्युत्तर

तसेच तक्रारीवर कारवाई करताना सदावर्ते यांना वैयक्तिक सुनावणी देण्याचेही न्स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने सदावर्ते यांना शिस्तभंगाच्या कारवाईत दोषी ठरवले व त्यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सदावर्ते यांनी माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने केली. त्यावेळी वकिलांसाठीचा पांढरा बँड परिधान करून वकिलांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले, असा आरोप करून पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे अध्यक्ष सुशील मंचेकर यांनी सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawyer gunaratna sadavarte charter suspended for two years ysh
First published on: 29-03-2023 at 00:41 IST