scorecardresearch

“खार पोलीस स्टेशनबद्दल बोललेच नव्हते”, चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या…

नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वकिलाचं स्पष्टीकरण

नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वकिलाचं स्पष्टीकरण

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा व्हिडीओ ट्वीट करत त्यांचे आरोप खोडून काढले आहेत. नवनीत राणा यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप केला होता. यानंतर संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा पोलीस ठाण्यात बसून चहा पितानाचा व्हिडीओ ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं. मात्र आता नवनीत राणा यांच्या वतीने त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

पोलीस आयुक्तांनी खोडले नवनीत राणांचे आरोप; ट्विट केला चहा पितानाचा व्हिडीओ; म्हणाले “आता यापेक्षा जास्त…”

पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. तसंच मला बाथरुम वापरण्याची परवानगीदेखील दिली नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा चहा पितानाचा व्हिडीओ ट्वीट करत आरोप फेटाळून लावले.

खार पोलीस ठाण्यात जातीवरुन माझा छळ; रात्रभर…; नवनीत राणांचे गंभीर आरोप; लोकसभा अध्यक्षांना पत्र

या व्हिडीओत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पोलीस ठाण्यात बसून चहा पित असल्याचं दिसत आहे. संजय पांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करताना आम्हाला अजून काही बोलायची गरज आहे का? अशी विचारणा केली आहे.

वकिलांचं स्पष्टीकरण –

वकील रिझवान मर्चंट यांनी नवनीत राणांनी केलेल्या विनंतीनंतर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत ते सांगत आहेत की, “माझ्या आशिलाने केलेल्या विनंतीनंतर हा व्हिडीओ तयार करत असून त्यांच्या वतीने ही वक्तव्यं करत आहे. एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नवनीत राणा यांनी अटकेत असताना पोलिसांकडून मुलभूत सुविधा मिळाली नसल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हे ट्वीट केलं आहे. मला फक्त हे स्पष्ट करायचं आहे की, अटक केल्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये असतानाचा व्हिडीओ संजय पांडे यांनी ट्वीट केला आहे. तिथे अधिकाऱ्यांनी चहासाठी विचारलं होतं, याबद्दल काही म्हणणं नाही”.

“तशी काही वस्तुस्थिती…”; नवनीत राणांना पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याच्या आरोपांवर गृहमंत्र्यांनी दिले उत्तर

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “पण ते रात्री १ वाजेपर्यंत खार पोलीस स्टेशनमध्ये होते. नंतर त्यांना सांताक्रूझमधील जेलमध्ये पाठवण्यात आलं. रात्रभर आणि कोर्टात हजर करेपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात आलं होतं. नवनीत राणा यांनी केलेले आरोप खार पोलीस ठाण्यात होते तेव्हाचे नसून सांताक्रूझमधील जेलमध्ये असताना मिळालेल्या वागणुकीबद्दल आहेत”.

नवनीत राणा यांनी पत्रात काय आरोप केले –

“मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घऱाबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. आणि मी तेवढंच करणार होते. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं की, तुम्हीही या. मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितलं की मातोश्रीवर जाणार नाही. त्याऐवजी माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे,” अशी माहिती नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.

“पुढच्या २४ तासात…”, नवनीत राणांच्या अटकेनंतर मोठी घडामोड; लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे सरकारकडून मागवली माहिती

“पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. हा सरसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे,” असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

राणा दांपत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; मुंबई हायकोर्टानंतर सत्र न्यायालयाचाही दिलासा देण्यास नकार

“मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असंही सांगितलं,” असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

यांच्या अटकेप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ओम बिर्ला यांनी २४ तासात ही माहिती सोपवण्यास सांगितलं आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून अमानवीय वागणूक दिली जात असल्याची तक्रार करणारं पत्र लिहिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही माहिती मागवली आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाच्या मार्फत ही माहिती मागवण्यात आली आहे.

लोकसभा अध्यक्षांनी मागवली माहिती

नवनीत राणा यांच्या अटकेप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ओम बिर्ला यांनी २४ तासात ही माहिती सोपवण्यास सांगितलं आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून अमानवीय वागणूक दिली जात असल्याची तक्रार करणारं पत्र लिहिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही माहिती मागवली आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाच्या मार्फत ही माहिती मागवण्यात आली आहे.

नवनीत राणा यांच्या तक्रारीत वस्तुस्थिती नाही – गृहमंत्री

खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यामध्ये वस्तुस्थिती नाही तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे तर ती माहिती राज्य सरकार देईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lawyer rizwan merchant after tweet by mumbai cp sanjay pandey navneet rana having tea in police station sgy