मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गावरील लकी जंक्शन येथील पाली जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोनपैकी एका ६०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास अचानक गळती सुरू झाली. पाणी गळती रोखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र महापालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयातील वांद्रे (प.) आणि आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

पाली जलाशयाला दोन मोठ्या जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ६०० मिलीमीटर व्यासाच्या एका मुख्य जलवाहिनीतून सोमवारी मध्यरात्री गळती होऊ लागली. गळतीचे वृत्त समजताच महापालिकेच्या जल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक

जलवाहिनीतून होत असलेल्या गळतीमुळे एच पश्चिम विभागातील (वांद्रे पश्चिम आणि आसपासचा परिसर) पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. तथापि, काही भागात वेरावली जलाशय व उर्वरित दुसऱ्या पाली इनलेटद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

हेही वाचा – मुंबई : नऊ वर्षांतील थंड डिसेंबर

उपरोक्त कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader