एखाद्या खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या वारसदारांनी दंडाची रक्कम भरायला हवी, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या माध्यमातून हा दंड भरता येईल, असेही न्यायालयाने हा निकाल देताना स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निकालाचा अनेक खटल्यांवर परिणाम होणार आहे.
न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांनी हा निकाल दिला आहे. एखाद्या दोषीचा मृत्यू झाला म्हणजे त्याला ठोठावण्यात आलेल्या दंड आपण का भरावा, असा दावा त्याचे वारस करू शकत नाही. उलट त्यापासून त्याच्या वारसांची सुटका होऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित मृत दोषी व्यक्तीच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या माध्यामातून दंडाचीही रक्कम वसूल केली जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील शमीम सरखोत यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याबाबत याचिका केली होती.